खूप काही

Chitra wagh : तर कोकणातील अजून जीव वाचले असले, चित्रा वाघ यांनी मांडली परिस्थिती

कोकणातील झालेल्या तळीयेच्या दुर्घटनेवेळी जर प्रशासनाने तत्परतेने लवकरात लवकर मदत केली असती, तर खुप जणांचे प्राण वाचू शकले असते.

Chitra wagh :  सर्वज्ञानी संजय राऊत आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे परत एकदा त्यांनी आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत पुन्हा एकदा विरोधक व केंद्रावर दोषारोप करून ते मोकळे झाले आहेत.कोकणातील झालेल्या तळीयेच्या दुर्घटनेवेळी जर प्रशासनाने तत्परतेने लवकरात लवकर मदत केली असती, तर खुप जणांचे प्राण वाचू शकले असते. असं विधान चित्रा वाघ यांनी माध्यमांशी बोलताना केले.

प्रवीण दरेकर आणि वृत्तवाहिन्या प्रशासनाच्या आधी घटनास्थळी पोहचल्या तेथील नागरिकांनीचे 39 मृतदेह बाहेर काढले.त्यानंतर 16 तासांनी प्रशासन तिथे अवतरले.ज्यावेळेस आपण प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणालाच प्राधान्य देतो, तेंव्हा होतकरू प्रशासकीय अधिकारी बाजूला सारले जातात.ठाकरे सरकारच्या मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात अशा दुर्घटनांमध्ये सरकारच्या निष्क्रीयेतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले.संजयजी यानंतरसुद्धा बदलीच्या अर्थकारणालाच प्राधान्य देणे म्हणजेच ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ हे कारण चुकीचं आहे. आशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

मा. नारायण राणे केंद्रातर्फे नुकसानीचा आढावा व मदतकार्यासाठी दौरा करत आहे. ते असताना अशावेळी अशा संकटात सुद्धा कुणाच्या सांगण्यावरून अधिकारी गैरहजर होते?पुरग्रस्त कोकणच्या जनतेला हे अपेक्षितच होते अशावेळेस तरी आपण आपली राणे साहेबांविषयीची पोटदुखी बाजूला सारून त्यांच्या हेतुला आपण साथ द्याल, परंतु आपण आपल्या हेकेखोर राजकारणाला प्राधान्य दिले. आसं खोचक टोला संजय राऊत यांना चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments