आपलं शहर

Corona Virus:मलाड पश्चिमेच्या डी मार्टला बीएमसीने केलं सील, सांगितलं एकमेव कारण

Corona Virus:मुंबई महानगरपालिकेने मालाडचे डी मार्ट सील केले आहे, कोरोना नियम न पाळल्यामुळे ही कारवाई सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी केल्याचं समोर आलं आहे

Corona Virus: मुंबई महानगरपालिकेने मालाडचे डी मार्ट सील केले आहे, कोरोना नियम न पाळल्यामुळे ही कारवाई सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी केल्याचं समोर आलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहीतीनुसार डी मार्टमध्ये 50 जणांना सोडले पाहिजे होते, मात्र या मालाडच्या डी मार्टमध्ये एकावेळी 500 पेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश दिला जात होता, नागरिकांनी डी मार्टमध्ये कोरोनाच्या कुठलाही नियमांचे पालन केले नव्हते, कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता 500 पेक्षा जास्त नागरिकांना एकावेळेस डी मार्टमध्ये सोडण्यात आल्यामुळे ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.

 

गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य आहे, मात्र मालाड लिंक रोडवर असलेल्या डी मार्टमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत होते, लोक मास्क वापरत नव्हते, सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा उडला होता आणि एकसाथ 500 पेक्षा जास्त लोकांना आतमध्ये सोडण्यात असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने डी-मार्टला पुढचा आदेश येईपर्यंत सील केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments