आपलं शहर

Covid-19 : मुंबईत कोरोनाचे 644 नवे रुग्ण, तर 9 जनांचा मृत्यू, आतापर्यंत किती मुंबईकरांना कोरोनाची लागण

Covid-19 : मुंबईत बुधवारी, 7 जुलैरोजी कोरोनाचे 644 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, कालच्यादिवशी 744 लोकांनी कोरोनावर मात केली आहे

Covid-19 : मुंबईत बुधवारी, 7 जुलैरोजी कोरोनाचे 644 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, कालच्यादिवशी 744 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरदिवशी 1000 पेक्षा कमी रुग्ण आढळून येत असल्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी समजली जात आहे.

डेल्टा व्हेरिएशनसह अनेक प्रकारांंनी डोकं वर काढल्यानंतर मुंबईतील आरोग्य यंत्रणा पुन्हा सज्ज झाली होती, मात्र आता कोरोनाच्या कमी केसेसमुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. असं जरी असलं तरी मुंबईकरांवर कोरोनाच्या तिसर्या लाटेचं संकट घोंगावत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी बेसावध राहणे, चुकीचे ठरेल.

मुंबईची ताजी परिस्थिती

कोरोनाचे सक्रिय रुग्ण : 7,816

आतापर्यंत एकूण कोरोनाचे रुग्ण : 7,26,284

आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या : 7,00,567

आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू : 15,573

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments