आपलं शहर

Covid 19 updates : कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ ,13 जणांचा मृत्यु

24 तासांत 44 हजार 459 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Covid 19 updates : मुंबई, 8 जुलै (पीटीआय) गुरुवारी मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 540 नवीन प्रकरणे नोंदली आहे. कोरोनामुळे आणखी 13 रुग्णांचा मृत्यू झाला.

गेल्या 24 तासांत 628 रुग्ण बरे झाले. शहरात आतापर्यंत 7,01,195 लोक बरे झाले आहेत, सध्या कोरोना बाधित 7714 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मृतांमध्ये सात पुरुष, तर सहा महिला रुग्णांचा समावेश होता. एक मृत रुग्ण 40 वर्षांखालील होता. 10 मृत झालेले रुग्ण 60 वर्षांवरील होते, तर दोन रुग्ण 40 ते 60 वर्षांमधील होते. दिवसभरात 37 हजार 802 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत 74 लाख 23 हजार 483 चाचण्या करण्यात आल्या आहेत. 96 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 44 हजार 459 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  तसेच देशभरात आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 88हजार 284 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments