Covid-19 vaccination : महाराष्ट्रानंतर या राज्याने सुरु केलं 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण
Covid-19 vaccination : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण संचालक डॉ. जी. श्रीनिवास राव यांनी सांगितले की, वय 18-44 वयोगटातील कोरोना लसीकरण मोहीम गुरुवारी तेलंगणामध्ये सुरू करण्यात आली आहे.

Covid-19 vaccination : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण संचालक डॉ. जी. श्रीनिवास राव यांनी सांगितले की, वय 18-44 वयोगटातील कोरोना लसीकरण मोहीम गुरुवारी तेलंगणामध्ये सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18-44 वयोगटातील व्यक्तींना कोविन पोर्टलवर आधी नोंदणी करावी लागेल, त्यानंतरच त्यांना लस मिळेल तर ग्रामीण भागातील नागरिकांना वॉक इन लस मिळणार आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण संचालक डॉ. जी. श्रीनिवास राव यांनी सांगितले की, 18- 44 वयोगटातील कोरोना लसीकरण मोहिमेची सुरुवात गुरुवारी (१ जुलै) तेलंगणा राज्यात झाली आहे. “प्रत्येक केंद्रावर 2000 जणांना लसीकरणासाठी सुमारे 100 लसीकरण केंद्रे स्थापन केली गेली आहेत.
राव यांनी पुढे सांगितले की गुरुवारी राज्यात 1.10 कोटीपेक्षा जास्त कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तेलंगणा राज्यात लसीकरणावर अतिशय जलद मार्गाने काम सुरु आहे. आम्ही सर्वात आधी उच्च-जोखीम गट आणि सुपर स्प्रेडर्संना लस देत आहोत. आत्तापर्यंत जवळपास 45 लाख डोस केवळ उच्च जोखमीच्या गटांना देण्यात आल्याची माहिती डॉ. जी. श्रीनिवास राव यांनी प्रसार माध्यांना दिली आहे.