आपलं शहर

Covid-19 Vaccination :मुंबईत फक्त 3 तास लसीकरण, यावेळी काय कराल?

लसीकरण रद्द केल्याने स्थानिक रहिवाशांना त्रास झाला होता.

Covid-19 Vaccination :मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी (2 जुलै रोजी) दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे आज फक्त 3 तास लसीकरण असेल, असं समजलं जात आहे.(The Brihanmumbai Municipal Corporation on Friday said the COVID-19 vaccination will take place only for 3 hours, from 2 pm to 5 pm, at a limited number of its centres in Mumbai today

कोरोनाचे लसीकरण आज (2 जुलै रोजी) दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मर्यादित संख्येने केले जाईल. तसेच कोव्हक्सिनचा फक्त दुसरा डोस फक्त 45 वर्षांवरील जास्त वयाच्या लोकांना दिला जाईल. 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी आज काही केंद्रां दरम्यान लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती बीएमसी ने दिली आहे.

एक जुलै रोजी लसींच्या कमतरतेमुळे नागरी आणि शासकीय संचालित केंद्रांवर covid-19 लसीकरण मोहीम रद्द केली होती. लसीकरण रद्द केल्याने स्थानिक रहिवाशांना त्रास झाला होता. गेल्या महिन्यात देखील लसीचे पुरेसे डोस नसल्याने लसीकरण थांबवले होते. आता तिच परिस्थिती आज उद्भवली आहे.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार आत्तापर्यंत 54 लाख 35 हजार 731 नागरिकांना लस देण्यात आली आहे. यापैकी 10 लाख 72 हजार 578 लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. 399 कोव्हिड सेंटर सध्या मुंबईमध्ये उपलब्ध आहेत, त्यापैकी 281 बीएमसी तर 20 राज्य सरकार आणि 98 खाजगी केंद्र उपलब्ध आहे.

यासंदर्भात रपालिकेकडून ट्विट करून माहिती दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments