खूप काही

Crime news:व्हेल माशाच्या उलटीचा अवैध धंदा, एका झटक्यात कोरोडपती बननं पडलं महागात

व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात करोडोंची किंमत आहे हे लक्षात घेऊन आरोपींनी त्याची तस्करी करण्याचे ठरवले

Crime news:एकीकडे कोरोनाने लोक त्रस्त आहेत त्यात अनेकांचे नोकरी व्यवसाय ठप्प पडलेत,अनेक लोकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे अशा काळात अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळू लागलेत.अशीच एक घटना आज ठाण्यात घडली. (Two accused of illegal trade of whale vomit arrested)

समुद्रात तरंगणारे सोने म्हणून ज्या वस्तूची ओळख आहे , ती म्हणजे व्हेल माशाची उलटी औषधांमध्ये ,परफुम ,चायनीज खाद्यपदार्थची लज्जत वाढवण्यासाठी व्हेल माशांच्या उलटीचा उपयोग करतात. यामुळे उलटीला आंतरराष्टीय बाजारात करोडोंची किंमत आहे. हेच ओळखून आणि कोरोना काळात आलेल्या आर्थिक संकटाशी दोन हाथ करण्यासाठी व्हेल माशाची उलटी विक्री करण्यास (smuggling whale vomit) दोन जण ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकास मिळाली होती.

सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी जुना जकात नाका, घोडबंदर रोड येथे सापळा लावला. यावेळी दोन संशयित इसम होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटारसायकल वरून जात असताना पोलिसांना आढळून आले.

दोघा मोटारसायकलस्वार इसमांना पोलिसांनी अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 4 किलो 100 ग्रॅम व्हेल माशाची उलटी आढळून आली. मंगेश जावळे व नंदकुमार दाभोळकर असे या आरोपींची नावे असून पोलिसांनी या दोघा तस्करांना अटक करीत व्हेल माशाची उलटी व मोटारसायकल जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या उलटीची किंमत तब्बल 4 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात करोडोंची किंमत आहे हे लक्षात घेऊन कोरोना मुळे डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी या दोन आरोपींनी त्याची तस्करी करण्याचे ठरवून हे कृत्य केले.या आधी त्यांचे नावावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली तर न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments