खूप काही

Cyber crime: भारत-पाकिस्तान वादात आणखी भर, पाकच्या हॅकर्सनी भारतीय नेत्याची वेबसाईट केली हॅक…

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाइट पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केली.

Cyber crime:उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाइट पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केली आहे. वेबसाइट हॅक करण्याव्यतिरिक्त हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध अपशब्द वापरले आहेत. खासदार गोपाळ शेट्टींनी (gopal shetty) सध्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Cyber ​​crime: India-Pakistan dispute escalates, Pakistani hackers hack Indian leader’s website)

गेल्या कित्येक दिवसांपासून खासदार गोपाळ शेट्टी सतत आपल्या भागातील जनतेला भेटत आहेत. यासह जम्मू-काश्मीरमधील (jammu Kashmir attack) पाकिस्तानकडून होणार्‍या हल्ल्याबाबत गोपाळ शेट्टींनी सतत पाकिस्तानला टार्गेट करून वक्तव्य केले . त्यामुळे पाकिस्तानी हॅकर्सनी त्यांची वेबसाईट हॅक करून त्यावर मोदींबद्दल अपशब्द वापरले आहेत.या सर्व प्रकरणाची सायबर सेलद्वारे चौकशी केली जात आहे .

पाकिस्तानी हॅकर्सनी पहिल्यांदाच एखाद्या भारतीय राजकारणी व्यक्तीची वेबसाइट हॅक केली असे नाही. याआधीही पाकिस्तानी हॅकर्सनी गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी (kishan reddy) यांची वेबसाइट हॅक केली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments