आपलं शहर

Cyber Fraud : सायबर क्रिमिनल्स पासून बचाव करण्यासाठी फक्त या गोष्टी घ्या जाणून..

Cyber Fraud : सायबर क्रिमिनल्स हे नेहमीच विविध मार्गांचा वापर करून लोकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात.

Cyber Fraud : सायबर क्रिमिनल्स हे अनेक ऑनलाईन Fraud करून, लोकांना फसवण्यासाठी नवीन नवीन Tricks चा वापर करत असतात. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांच्या जाळ्यात अडकून, फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.

सायबर क्रिमिनल्स हे नेहमीच विविध मार्गांचा वापर करून लोकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. कधी बनावट ऑफर्स तर कधी एखाद्या बनावट किंवा खोट्या लिंक चा सहारा घेऊन. आणी अशा अनेक प्रकारे ते ते लोकांची फसवणूक करतात.

UPI :

यूनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे कोणाकडूनही सहजपणे पैसे मागितले जातात. फ्रॉडस्टर्स व्यक्तीला डेबिट लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगतात, पिन टाकल्यानंतर खात्यातून पैसे कट होतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी डेबिट रिक्वेस्टला डिलीट करा, त्यावर क्लिक करू नये.

QR कोड :

यामध्ये व्यक्तीच्या मोबाईल वर QR कोड पाठवला जातो, आणि ज्याक्षणी तो व्यक्ती त्या QR कोड वर क्लिक करतो, लगेंचंच त्या व्यक्तीच्या खात्यामधून रक्कम काढून घेतली जाते. त्यामुळे कोणत्याही ऑफरच्या जाळ्यात अडकू नका आणि सेल वैगरे च्या नावाखाली येणाऱ्या मेसेजेस वर विश्वास ठेवू नका.

WhatsApp कॉल :

एखाद्या अनोळखी नंबर वरून कॉल आल्यास नेहमी सावध असणे गरजेचे आहे. कारण कधीही कोणतीही व्यक्ती तुम्हाला ऑनलाईन व्हॉइस कॉल करून तुम्हाला फसवू शकते. आणि तुमचा नंबर ब्लॉक करू शकते.
सध्या कोरोनाच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक देखील केली जातेय. त्यामुळे WhatsApp वर एखादी कोरोना संबंधित लिंक किंवा QR कोड आल्यास त्यावर क्लिक करू नका.

आपण जर या गोष्टी जाणून घेतल्या, तर नक्कीच आपल्याला या Online Fraud पासून स्वतःला वाचवता येईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments