फेमस

Danish Siddiqui Story : …म्हणून दानिश सिद्दीकी सगळ्यांपेक्षा वेगळे होते, पाहा त्यांचे शेवटचे संपूर्ण क्षण

Danish Siddiqui Story : सगळेजण भारतात राहून अफगाणिस्थानातील वृत्तांकन करत होते, मात्र दानिश सिद्दीकी चक्क अफगाणिस्थानमध्ये जाऊन वृत्तांकन करत होते, त्यामुळे त्यांच्या कामाला खरच सलाम! हे शब्द आहेत, जेष्ठ पत्रकार रविश कुमार यांचे.

पुलित्झर पुरस्कार विजेते आणि भारतातील सर्वात ट्रेंडिग ठरणाऱ्या फोटोंचे जनक म्हणून ओळखले जाणारे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांचे अफगाणिस्थानात काम करत असताना गोळी लागून मृत्यू झाला. शुक्रवारी, 16 जुलै रोजी कंधारमधील स्पिन बोल्दक येथे सुरु असलेल्या चकमकी वेळी त्यांना गोळी लागली. (danish siddiqui story indian photojournalist killed in afghanistan)

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि कंधारमधील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल ते वृत्तांकन करत होते, यावेळी त्यांनी केलेलं वृत्तांकन संपूर्ण देश पाहत होता, काही मिशनसाठी त्यांनी अफगाण स्पेशल फोर्ससलाही टॅग केले होते.

रॉयर्टर्सने दिलेल्या वृत्तानुसार, दानिश सिद्दीकी आणि वरिष्ठ अफगाण अधिकारी तालिबान क्रॉसफायरमध्ये आढावा घेत होते. स्पिन बोल्दकच्या मुख्य बाजारपेठेत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि तिथे झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.

दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू होण्याच्या आधल्या दिवशी ते जखमी झाले होते, मात्र त्याचवेळी तालिबानी सैनिकांनी स्पिन बोल्दकमधून पाय बाहेर काढला होता, त्यामुळे तिथली परिस्थिती काही प्रमाणात सावरली होती. मात्र त्यातच पुन्हा परिस्थिती बिघडली आणि होत्याचं नव्हतं झालं.

अफगाणिस्तान आणि इराक यांच्यामधील युद्धे, रोहिंग्याची शरणार्थीं, हाँगकाँगची निदर्शणे, नेपाळ भूकंप अशा अनेक परिस्थिती दानिश यांनी कव्हर केल्या आहेत, या कर्तबगारीमुळेच त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांनी काढलेले अनेक फोटोंनी अनेक विक्रम केले आहेत. त्यांच्या अनेक फोटो जगामध्ये प्रसिद्ध झाले आहेत, मात्र अशा एका बड्या फोटोग्राफरचा अंत झालाय, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments