कारण

2 दिवसीय अधिवेशनात किती तास, कोणत्या मुद्द्यावर काम चाललं, वाचा एका क्लिकवर…

महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या आडमुठेपणासह सत्ताधाऱ्यांच्या दांडगात संपन्न झाले.

महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या आडमुठेपणासह सत्ताधाऱ्यांच्या दांडगात संपन्न झाले. सोमवार, 5 जुलै आणि मंगळवार, 6 जुलै अशा दोन दिवसांमध्ये विधीमंडळाचं कामकाज आटोपतं घेतलं. मात्र या दोन दिवसात नेमकं किती तास आपल्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी काम केलं, हेदेखील तपासून पाहिलं पाहिजे.

या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात फक्त 10 तास 10 मिनिटांचे कामकाज विरोधकांसह मंत्र्यांनी केलं आहे. या सगळ्यात विचार केला तर 1 तास 25 मिनिटे फक्त वाया गेलेला वेळ आहे. जरी या 2 दिवसांच्या अधिवेशनात 12 विधेयके मांडण्यात आली असली तरी सगळ्या भांडणांमध्य 9 विधेयके मंजूर करण्यात आली.

कोरोनामध्ये संपूर्ण अधिवेशन पार पडलं. कोरोनाचे संक्रमन वाढू नये म्हणून मविआने हे अधिवेशन 2 दिवसांचे आयोजित केलं होतं. मराठा आरक्षण, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी पहिल्या दिवसापासून सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते मुद्दे विरोधकांमुळे जास्त वेळ चर्चेच आले नाहीत. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे हे अधिवेशन चर्चे राहिले.

गोंधळ केल्यामुळे तालिका अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन केले होते. प्रत्येक दिवशी सरासरी 5 तास 10 मिनिटे सभागृह चालले.

सभागृहात कोणती विधेयके मांडली

नागरी क्षेत्रातील झाडांचे संरक्षण आणि जतन सुधारणा विधेयक

महाराष्ट्र परगणा आणि कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबतचे विधेयक

महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक

महाराष्ट्र परिचारिका विधेयक

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक

महाराष्ट्र राजभाषा विधेयक

महाराष्ट्र सार्वजनिक क्रिडा विद्यापीठ विधेयक

सन 2021 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक

महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2021

शक्ती फौजदारी कायदा विधेयक

Marathi: राजभाषेच्या कायदा 1964 मध्ये दुरुस्ती, मराठी भाषेवरून नवा कायदा

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments