खूप काही

Economy update : कोणालाच आर्थिक मदत मिळणार नाही, वित्त आयोगाची घोषणा

राज्याच्या वित्त व्यवस्थेवर होणाऱ्या या परिणामामुळे आर्थिक काटकसरीच्या उपाय योजना राबवण्यात याव्या अशा सूचना प्रशासकीय विभागांना देण्यात आले आहेत.

Economy update : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनामुळे देशातच नव्हे, तर जगभरातही लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बंद झाले, अनेकांना आपल्या नोकरीदेखील सोडाव्या लागल्या. सर्वसामान्य नागरिकांचे अर्थचक्र अचानकच कोलमडले, त्याचा फटका फक्त सर्वसामान्यांना झाला असं नाही. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे कठोर निर्बंधामुळे राज्याची आर्थिक परिस्थितीही खचली आहे.

कोणत्याही कारणांसाठी निधी कोणत्याही विभागात मिळणार नसल्याचे वित्त आयोगाने गुरुवारी (29जुलै रोजी) जाहीर केले आहे. राज्याची आर्थिक स्थिती कोलमडली असून विकास कामांच्या खर्चावरील निर्बंध आणण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता चालू असलेल्या आर्थिक वर्षात सर्व विभागांना अर्थसंकल्पात तरतुदीसाठी फक्त 60 टक्के निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सर्व विभागांनी योजनांचा आढावा घेऊन आवश्यक असेल तेवढा खर्च करावा त्यापेक्षा अधिक निधी मिळणार नसल्याचे वित्त आयोगाकडे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा राज्याच्या आर्थिक स्थितीला मोठा फटका बसला आहे.

सरकारच्या विविध भागांना लागणाऱ्या वस्तूंच्या साहित्यांच्या खरेदीवर बंदी घालण्यात आली असून राज्यात लागू असलेल्या निर्बंधांमुळे सरकारच्या कर व करोत्तर उत्पादनातील महसुलात देखील घट झाली आहे. राज्याच्या वित्त व्यवस्थेवर होणाऱ्या या परिणामामुळे आर्थिक काटकसरीच्या उपाय योजना राबवण्यात याव्या अशा सूचना प्रशासकीय विभागांना देण्यात आले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments