खूप काही

EKNATH SHINDE : ठाणे ते बोरिवली, फक्त 15 मिनिटांत अंतर पार, पाहा कसा आहे मास्टर प्लॅन

ठाण्यावरून बोरिवलीला जाण्यासाठी फक्त पंधरा मिनिटांचा प्रवास करावा लागणार आहे, यावर महाराष्ट्रातील राज्य विकास महामंडळाकडून (MMRDC) भूमिगत रस्ते बांधण्याची योजना आखण्यात आली आहे,

eknath shinde : ठाण्यावरून बोरिवलीला जाण्यासाठी फक्त पंधरा मिनिटांचा प्रवास करावा लागणार आहे, यावर महाराष्ट्रातील राज्य विकास महामंडळाकडून (MMRDC) भूमिगत रस्ते बांधण्याची योजना आखण्यात आली आहे, म्हणजेच अजून कनेक्टिव्हिटीला गती देण्याचा विचार राज्य सरकार करणार आहे.

ठाणे आणि बोरिवलीला जोडणारा दुहेरी बोगदा प्रवाशांसाठी अगदी जलद गतीने संपणार आहे, त्यामुळे नक्कीच प्रवासाचा वेळ वाचणार आहे. घोडबंदर रोड वरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी 11,235,43 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

ठाण्यातील टिकुजीनी वाडी ते पश्चिम बोरिवलीपर्यंत धृतगती महामार्गापर्यंत हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या मार्गावर संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालील 10.25 किलोमीटरचा दोन ते तीन लेनचा बोगदा तयार करण्यात येणार आहे, तसेच 11.8 किलोमीटर लांबीचा हा रस्ता तयार करण्यात येणार आहे.

हा रस्ता संजय गांधी उद्यानात जाणार आहे, त्यामुळे तेथील वनस्पती प्राणी पक्षी यांना कोणतीही जीवित हानी होऊ नये, याची खबरदारी (MMRDC) ने घेतलेली आहे. मार्च 2022 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. या मार्गावर दर 300 मीटरवर क्रॉस बोगदे असणार आहेत आणि यामुळेच प्रवाशांना 80 किलोमीटर पर ताशीने प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे.

त्यामुळेच आठ किलोमीटरचा प्रवास हा फक्त पंधरा ते वीस मिनिटांवर होणार आहे. परिणामी वेळेची बचत तर होणारच आहे आणि त्यातच 10.5 टक्के इंधनाची देखील बचत होणार आहे. पर्यावरणास अनुकूल आणि प्रवाशांसाठी बोगद्यामध्ये स्वच्छ आणि ताजी हवा राहील, यासाठी अनेक उपाय योजना देखील करण्यात येणार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments