आपलं शहर

Electric Vehicle Charging Station:नवी मुंबईमध्ये उभारलं देशातील सगळ्यात मोठं इव्ही चार्जिंग स्टेशन

Electric Vehicle Charging Station:उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नवी मुंबईच्या तुर्भे इथे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचं उद्घाटन केलं आहे.

Electric Vehicle Charging Station:उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नवी मुंबईच्या तुर्भे इथे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचं उद्घाटन केलं आहे.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पेट्रोलची भविष्यात होणारी कमी आणि रोज वाढत असलेली किंमत, यामुळे सामान्य माणसाला हा भाव परवडणारा नाही. याचकारणामुळे इलेक्ट्रिक वाहनांना सरकारने प्रोत्साहन द्यायचं ठरवल आहे. यासाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची गरज आहे.  मजेंडा कंपनी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची कमतरता पूर्ण करणार आहे.या कार्यक्रमात कंपनीचे कार्यकारी दिग्दर्शक मॅक्स लुईस डायरेक्टर देरील डायस, सुजय जैन आणि महावीर लूनावत उपस्थित होते.

हे देशातील सर्वात मोठं चार्जिंग स्टेशन आहे. कंपनीने चार्जिंग स्टेशनला लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पेअर पार्टची निर्मिती सुरू केली आहे. हे स्पेअर पार्ट पूर्ण भारतीय बनावटीचे आहेत. या स्टेशनवर 21 चार्जर लागलेले आहेत, ज्यामध्ये 4 DC चार्जर आहेत, त्याची क्षमता 15 ते 50 kw आहे. 17 AC चार्जर आहेत, त्याची शमता 3.5 ते 7.5 KW आहे, हे सगळे चार्जर पूर्णपणे भारतात बनवलेले आहेत, हे चार्जर 40 kv आणि पॉवर बरोबर स्थानिक ग्रीड बरोबर जोडले गेले आहेत.ही सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे आणि चार्जिंग ग्रिडच्या ॲपद्वारे याचा वापर होणार आहे.कंपनीने दर महिन्याला 4000 AC चार्जर बनवण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments