फेमस

पुन्हा गाजनार इंडिया, इंडियाचा जयघोष, ENG vs IND

ENGLAND VS INDIA : WTC च्या अंतिम फेरीनंतर भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुट्टी देण्यात आली होती. अखेर 3 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय खेळाडूंनी प्रशिक्षणासाठी उपस्थित लावली आहे.

England vs India : WTC च्या अंतिम फेरीनंतर भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुट्टी देण्यात आली होती. अखेर 3 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय खेळाडूंनी प्रशिक्षणासाठी उपस्थित लावली आहे.

क्रिकेट आणि बायो-बबल आयुष्यापासून तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय खेळाडू शुक्रवारी डरहॅममध्ये एकत्र जमले. भारतीय कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांनी देखील प्रॅक्टिसला उपस्थिती लावली आहे.

1626512471161 copy 900x500

टीम इंडियाने शुक्रवार, 16 जुलै रोजी पहिल्या प्रशिक्षण सत्रात भाग घेतला आणि खेळाडूंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रशिक्षण सत्रामधील काही क्षण शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली.

कॅम्पमधील स्वतःचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर करताना रोहितने लिहिले आहे की, “चलो भाई, छुट्टी खतम, अब काम शुरू.

1626512404338 copy 900x500

भारत आणि इंग्लंड (India vs England) या दोन तगड्या संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे, हे संपूर्ण सामने लंडनमध्ये होणार असल्याची माहिती BCCI ने दिली आहे, तर 4 ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही जरी क्रिकेट रसिकांसाठी मोठी बाब असली तरी चाहत्यांसाठी एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. या सामन्यांआधीच यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला कोरोना झाल्याचं वृत्त समोर येत आहे. यामुळे पंतची जागा कोण सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments