खूप काही

EPFO : PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! खात्यात जमा होणार इतके व्याज

आज खात्यात येऊ शकतात 8.5 % व्याजाची रक्कम 9 वर्षांनी होतायंत बदल

1 ऑगस्टपासून एटीएम (ATM) इंटरचेंज फीस (InterChange) 15 रुपयांवरुन 17 रुपये करण्यात येणार आहे. एटीएम ट्रान्झॅक्शन शुल्कामध्ये 9 वर्षानंतर बदल झाले आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्कात वाढ केली आहे. आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये करण्यात आली आहे.

ही बँकिंग सेवा (Banking Services) वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही एटीएम, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल, तर यावरील शुल्कासंदर्भात आरबीआयकडून (RBI) एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करत आहे.

सध्या हे इंटरचेंज शुल्क वित्तिय व्यवहारांसाठी 15 रुपये तर गैरवित्तिय व्यवहारांसाठी 5 रुपये आहे. एटीएममधून रोख काढण्याच्या नियमात बदल आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये केली आहे. हे दर 1 ऑगस्टपासून लागू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

काय आहे इंटरजेंज शुल्क?

जेव्हा एखादा ग्राहक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करतो, तेव्हा हे पेमेंट प्रोसेस करणाऱ्या मर्चेंटच्या बँक खात्यातून ट्रान्झॅक्शन फी घेतली जाते. अशावेळी जर एखाद्या ग्राहकाने कोणत्याही दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर केला तर अशावेळी तुमची बँक त्या दुसऱ्या बँकेला शुल्क देते. या शुल्काला इंटरचेंज चार्ज (Interchange charge) सांगितले जाते.

हे नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आरबीआयच्या मते, इंटरचेंज शुल्क ग्राहकाने क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास मर्चंट बँकेला लागू होतात. कार्ड इशू करणारी बँक इंटरचेंज फी पे करते. हे शुल्क बँका आणि एटीएम कंपन्यांमध्ये नेहमीच वादाचा विषय ठरले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments