आपलं शहर

FINANCE MINISTRY:चांगला परतावा देणाऱ्या कंपनीला केंद्र सरकार विकणार

FINANCE MINISTRY:आर्थिक संकटाला सामोरे जाणारे सरकार 1.75 लाख कोटी निर्गुंतवणूक आणि खासगीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

FINANCE MINISTRY:आर्थिक संकटाला सामोरे जाणारे सरकार 1.75 लाख कोटी निर्गुंतवणूक आणि खासगीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासंदर्भात सरकार खनिज क्षेत्रातील एनएमडीसीमधील आपला हिस्सा विकणार आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी एनएमडीसीतील सात टक्के समभाग विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला, असल्याचं काही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एकूण 3,700 कोटी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 10.55 कोटीहून अधिक शेअर्स विक्री ऑफरमध्ये ठेवण्यात आले आहेत, तर 22.55 कोटी शेअर्ससाठी बोली लावण्यात आली असून, एकूण ऑफरच्या 2.14 पट वाढीव आहे. एनएसईकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (डीआयआय) 166.46 च्या नाममात्र किंमतीवर 3,753 कोटी रुपयांच्या बोली आहेत.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी विक्रीची ऑफरही लवकरच समजतील. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील खाण कंपनी एनएमडीसीमध्ये 21.95 कोटी शेअर्स किंवा 7.49 टक्के भागभांडवल किमान 165 रुपये दराने विकत आहे. या भाग विक्रीतून सरकारी तिजोरीला 3,700 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. बीएसई वर एनएमडीसीचे समभाग 3.22 टक्क्यांनी घसरून 169.65 वर बंद झाले.

52 आठवड्यांचा उच्चांक 213.20 रुपये आणि कमी 75.60 रुपये आहे. कंपनीची मार्केट कॅप सुमारे 50 हजार कोटी रुपये आहे. या समभागाने गेल्या तीन महिन्यांत 22 टक्के, संपूर्ण वर्षात 50 टक्के आणि गेल्या एका वर्षात 100 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे. सरकारव्यतिरिक्त डीआयआयच्या नंतर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 20.76 टक्के आहे. म्युच्युअल फंडांनीही मार्च तिमाहीत आपला हिस्सा वाढविला आहे.

एनएमडीसीमध्ये सध्या सरकारची 68.29 टक्के हिस्सेदारी आहे. चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. अ‍ॅक्सिस बँकेतील भागभांडवल एसयूयूटीआय (युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे स्पेशिफर्ड अंडरटेकिंग ऑफ इंडिया) च्या माध्यमातून आतापर्यंत 3,994 कोटी रुपये जमा झाले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments