Devendra Fadnavis : मराठा आरक्षण ते नाना पटोले, देवेंद्र फडणवीसांनी सरकारला पॉईंट टू पॉईंट घेरलं..
केंद्रामधील मंत्रिपदावरून काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

Devendra Fadnavis : कोरोनाची परिस्थिती पाहता पावसाळी अधिवेशन देखील दोन दिवसाचे करण्यात येत आहे. येत्या पाच आणि सहा जुलैला पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, मात्र अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांची निवड व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष भाजप बरोबरच काँग्रेसने देखील केली आहे.
गेल्या काही दिवसात विधानसभा अध्यक्ष कोण होणार, या चर्चेला उधाण आलं होतं आणि त्यातच कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार आहे असं विधान त्यांनी केलं. त्याबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड होऊ द्या, मग भाजप आपलं मत मांडणार आहे, राज्य सरकारने त्यांची भूमिका मांडावी, त्यानंतर आम्ही आमची रणनीती सर्वांसमोर आणू,असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये मंत्री पद मिळणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे, ज्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधील भाजपच राजकारण माहिती आहे, त्यांचा नक्कीच लक्षात येईल की मी महाराष्ट्र बाहेर जाण्याचं कोणतंही कारण नाही. (Devendra Fadnavis ruled out the possibility of getting a ministerial post at the Center)
अशा प्रकारच्या चर्चा या राजकीय वर्तुळात नेहमीच चालत असतात परंतु भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आदेश देतात, तो सर्वांसाठीच शिरोधार्य ठरतो. त्यामुळे जे माझे शुभचिंतक आहेत, आणि मला दिल्लीत काही तरी मिळत आहे, याचा त्यांना आनंद होत आहे. त्यांना मला सांगावेसे वाटते की मी महाराष्ट्राबाहेर जाण्याची शक्यता नाही. काही जणांना असं वाटत असेल की मी महाराष्ट्र बाहेर गेलो की बला टळेल, मात्र ही बला टळणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं.
फेरविचार याचिकेला मर्यादा असतात, हे न्या. भोसले समितीने आधीच त्यांच्या अहवालात नमूद केले होते.
त्यामुळे न्या. भोसले समितीच्या शिफारसी राज्य सरकारने तत्काळ अंमलात आणाव्यात, अशी आमची मागणी आहे.#मराठा_आरक्षण pic.twitter.com/gziGmWFPr1— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 1, 2021
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्विचार याचिकेला जास्त स्कोप नसतो. मात्र सरकार फक्त वेळकाढूपणाचं धोरण करत आहे, हे खरं तर सरकारने दूर करायला हवं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जस्टिस भोसले यांनी ज्याप्रमाणे सांगितले आहे, त्याप्रमाणे सरकारने पावले उचलायला हवीत असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
राज्य सरकारने वेळकाढू धोरण न अवलंबता न्या. भोसले यांच्या समितीने सांगितल्याप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत तत्काळ पुढील कारवाई करावी!
नागपूर येथे माध्यमांशी साधलेला संवाद…https://t.co/PqTSWIwJs8 pic.twitter.com/KCygV9INV1— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 1, 2021
संजय राऊत (sanjay Raut) आणि महा विकास आघाडी सरकारमध्ये घेण्यात येणाऱ्या बैठकांबाबत ही फडणवीस यांनी आपलं मत मांडलं आहे. हे सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, कोणाला असं वाटतं की त्यांचं सरकार खतऱ्यात आहे, याची मला नाममात्र कल्पना नाही. लोकांना असं वाटतं की सरकार बनवतो मात्र तसं नसून आम्ही सरकार बिघडवतोय आणि आम्हीच सरकार चालवत आहे, असं झालंय मात्र त्यांना देखील त्यांचं समाधान वाटू द्या, असं मत देखील फडणवीसांनी व्यक्त केलं आहे.
नाना पटोले (nana patole) यांच्या पत्रव्यवहारवरून त्यांना ऊर्जा मंत्रिपद हवं आहे, असं वाटतंय. त्या एका कारणामुळेच त्या अशा प्रकारची पत्रं लिहीत असतील, तर सर्वांसमोर शंका उभी राहतेय, त्याचे पुरावे देखील त्यांनीच दिले आहेत, त्यामुळे चौकशी तर झालीच पाहिजे, नाना पटोले म्हणत आहेत, की हा भ्रष्टाचार आहे, जर प्रदेशाध्यक्ष आपल्याच मंत्र्याविरुद्ध भष्ट्राचार झाला असे सांगत असतील, तर त्यांच्या मधील गैरव्यवहार हा चव्हाट्यावर आणला आहे.