आपलं शहर

Gate Way Of India : गेट वे ऑफ इंडियाजवळ महिला समुद्रात कोसळली त्यानंतर …

Gate Way Of India : किनाऱ्यावरील लाटा बघायला गेलेली स्त्री अचानक तिचा तोल जाऊन सुमारे 20 फूट खोल समुद्रात पडली

Gate Way Of India : सोमवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एक मोठा अपघात झाला. किनाऱ्यावरील लाटा बघायला गेलेली स्त्री अचानक तिचा तोल जाऊन सुमारे 20 फूट खोल समुद्रात पडली. तिचा जीव वाचवण्यासाठी एका 50 वर्षाच्या व्यक्तीने समुद्रात उडी मारली.त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी दोरी आणि नळ्या फेकून महिलेला वाचण्याचे प्रयत्न केले. जीव वाचवायला गेलेल्या माणसाने त्या महिलेला नळीमध्ये टाकले आणि दोरीच्या मदतीने पायऱ्यापर्यंत पोहोचले.जीव वाचवनारा 50 वर्षीय व्यक्ती हे प्रवेशद्वार जवळील छायाचित्रकार गुलाबचंद गोंड होय. अथक प्रयत्नानंतर महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आलेे.

मुंबई मध्ये पावसाचा जोर वाढला आहे.पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्यासाठी नेहमीच नागरिक उत्साहात आसतात. त्यातच कर्फ्यु असल्यामुळे पर्यटन स्थळे थोड्याफार प्रमाणात खुली करण्यात आली आहे.आश्यने वाढणारी गर्दी आणि न घेतली जाणारी काळजी किती जीवावर बेतू शकते याचा जिवंत उदाहरण देणारी ही घटना घडली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments