खूप काही

Ghatkopar Car : कार बुडाल्याचा फायदा, मालका मिळाली नवी कार, तेही फुकट

मागील महिन्यात एक कार अचानक एका खड्ड्यामध्ये बुडतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे कारने आत्महत्या केल्याच्या मीन्सने सोशल मीडियावर धुमाकुळ माजवला होता.

Ghatkopar Car : मागील महिन्यात एक कार अचानक एका खड्ड्यामध्ये बुडतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे कारने आत्महत्या केल्याच्या मीन्सने सोशल मीडियावर धुमाकुळ माजवला होता. घाटकोपरच्या रामनिवास इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या विहिरीमध्ये ही कार बुडाल्याने यावर खूप वादळ निर्माण झालं होत. ती कार बाहेर काढल्यानंतर मोठं नुकसान झाल्याचंही समोर आलं होतं, मात्र या सगळ्यानंतर कारमालक डॉ. किरण दोषींना मोठा फायदा झाला आहे. मालकाला बजाज अलाएन्सने एक नवी कोरी कार भेट दिली आहे.

कार पाण्यात बुडाल्यानंतर बजाज अलाएन्सचे कर्मचारी माझ्या घरी आले होते. त्यांनी माझ्याकडून काही फॉर्म भरुन घेतले. त्यानंतर कंपनीने डिलरच्या माध्यमातून डॉ. दोषींना कार देण्यात आली. असं मत डॉ. किरण यांनी मांडलं आहे.

काय आहे प्रकरण ?

घाटकोपरच्या राम निवास बिल्डिंगसमोर नौरोजी लेन येथे किरण दोषी यांची कार भूमिगत केलेल्या विहिरीत पडल्याची घटना घडली. गाडी विनहिरीवर असलेल्या स्लॅबवर पार्क केली होती. ही गाडी सकाळी 8.30 च्या सुमारास स्लॅब खचल्याने 40 फुट खोल विहिरीमध्ये गेली. ( Ghatkopar Car sinking in Well) या घटनेत कुणी जखमी वगैरे झालं नाही. ही गाडी ज्यांची होती, त्यांनीच गाडी बुडतानाचा हा व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावपर तुफान व्हायरल झाला. ट्विटरवर घाटकोपर हे नाव देखील या व्हिडीओमुळे ट्रेंडिंगला आले होते. माहितीनुसार घाटकोपरमध्ये या विभागात अशा प्रकारे अनेक विहिरी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही विहीर देखील खूप वर्ष जुनी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बीएमसीची माहिती..

या घटनेचा व्हिडीओ आल्यानंतर काही यूजर्सनी मुंबई महापालिकेला याबाबत विचारणा केली होती. यावर BMC नं ट्विट करत सांगितलं की, घाटकोपरमधील कारच्या या घटनेशी महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही. ही खासगी सोसायटी परिसरातील घटना आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर या अनुषंगाने मदत कार्य म्हणून महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याचे काम करण्यात आले होते. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजना तातडीने करण्यासंबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments