आपलं शहर

HEAVY RAINFALL : भिवंडीत जोरदार पाऊस, पडघा परिसर पाण्याखाली

HEAVY RAIN FALL : सतत 3 ते 4 दिवस मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे,

HEAVY RAINFALL : सतत 3 ते 4 दिवस मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे, अशात कित्येकांच्या घरात पाणी शिरले, तर कित्येक ठिकाणी वाहतूक, विज पुरवठा खंडित झाला आहे.

त्यातच, भिवंडी इथे सतत पाऊस चालू असल्यामुळे भिवंडी परिसर तसेच पडघा परिसर पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे. सतत मुसळधार पाऊसामुळे येथील वाहतूक ही ठप्प झाली आहे.

पडघा परिसरात पाणीच पाणी झाले आसुन रस्त्यांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आलं आहे. अनेकांच्या घरात आणि दुकानातही पाणी शिरले असून परीस्थिती हलाखीची झाली आहे. पडघा परिसरातील वंजारपट्टी या पुलावर पाणी साचल्यामुळे वाहनांच्या 1 ते 2 किमी पर्यंत रांगा लागून आहेत. नद्या ओसांडून वाहत आहेत, त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments