आपलं शहर

HEAVY RAIN : पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत, नद्यांना महापूर…

HEAVY RAIN : मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यातही सतत मुसळधार पाऊस पडत आहे.

HEAVY RAIN : मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यातही सतत मुसळधार पाऊस पडत आहे. तरी आज पहाटेपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली, तरी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील रस्ते तसेच मुख्य शहरांना जोडणारे रस्तेदेखील पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. म्हणूनच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हात नदी आणि वैतरणा नदीला पूर आला असून पुराचं पाणी मनोर परिसरात शिरल्याने मनोर गावासोबतचा 16 तासापासून संपर्क तुटला आहे.

मुंबई – अहमदाबाद महामार्ग आणि पालघरला जोडणारा रस्ता पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांवरील लहान साकव, मोऱ्या वाहून गेल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पाण्याच्या प्रवाहामुळे मनोर येथील बांधन गावची मोरीच वाहून गेल्याने बांधन गावाचा संपर्क तुटला आहे, मनोर गावातील महावितरण विभागाचे सब स्टेशन पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. अनेक सखल भागात असलेल्या घरात आणि सोसायट्यांमध्येही पाणी शिरले आहे आणि रस्त्यात उभ्या असलेली वाहने देखील पाण्यात बुडाले आहेत. अशा प्रकारे पालघर मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments