खूप काही

POLICY RULES: पॉलिसी घेतल्यानंतर किती दिवसांत करू शकता सरेंडर, वाचा फक्त 4 नियम

आपले पुढील भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा पॉलिसी आधिक गरजेची असते.

POLICY RULES: आपले पुढील भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा पॉलिसी आधिक गरजेची असते. वेगवेगळ्या कंपन्या ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारची पॉलिसी पुरवतात. कोणतीही पॉलिसी घेतल्यास पॉलिसीधारकाला काही हक्क देखील मिळतात. याअंतर्गत, जर पॉलिसीधारकास ती पॉलिसी सरेंडर करायची असेल किंवा इतर पर्याय हवे असतील तर ती सुविधा देखील उपलब्ध असते. याच अधिकारांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

15 दिवसाच्या आत पॉलिसी रद्द करू शकतो

विमा नियामकांच्या निर्देशानुसार पॉलिसीधारक कागदपत्रे जमा झाल्यापासून 15 दिवसांच्या आत विमा पॉलिसी रद्द करू शकतात. आपल्याला पॉलिसीच्या कोणत्याही अटी किंवा शर्ती समजत नसल्यास आपणास ती रद्द करण्याचा अधिकार आहे.

पॉलिसी परताव्यावर तुम्हाला प्रीमियम मिळू शकतो

जर आपण आरोग्य विमा पॉलिसी विकत घेतली असेल तर त्यामध्ये एक ‘फ्री लूक पीरियड’ देण्यात येतो, जेणेकरुन आपण पॉलिसी पूर्णपणे समजून घेऊ शकतो. असे असूनही, ती पॉलिसी योग्य वाटत नसल्यास आपण ती रद्द देखील करू शकतो. ठोस कारण देऊन आपण पॉलिसी परत करू शकता. यानंतर आपल्याला भरलेली प्रीमियम रक्कम परत मिळेल. जर विमा कंपनीने वैद्यकीय तपासणी किंवा मुद्रांक शुल्कासाठी पैसे भरले असतील तर ती रक्कम कपात केली जाईल

माहितीचा अधिकार

आयआरडीएच्या (IRDA) मार्गदर्शक सूचनांनुसार, विमा कंपनी किंवा एजंटने ग्राहकांनी खरेदी केलेल्या पॉलिसीबद्दल संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी बेनिफिट्स, प्रीमियम, प्रीमियमचा मोड, मुदतीचा कालावधी, शुल्क आणि कर यासारख्या सर्व माहिती आपल्याला माहित असणे आवश्यक आहेत.

दुसर्‍या पॉलिसीवर जाण्याचा अधिकार

जर आपण युनिट लिंक्ड विमा पॉलिसी (ULIP) विकत घेतली असेल तर आपल्याकडे अंशतः पैसे काढण्याचा अधिकार आहे. याच्यातून आपण दुसर्‍या पॉलिसीवर स्विच करू शकता. या व्यतिरिक्त, प्रीमियम पेमेंटच्या मोडमध्ये बदल करणे, पॉलिसीची मुदत बदलणे, सम अ‍ॅश्युअर्ड वाढविणे इत्यादीसारखे काही बदल हवे असतील तर आपण तेही सहजपणे करू शकतो.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments