blog

Ind vs Sl t20 : अखेर श्रीलंकेचा विजय, शेवटच्या काही ओव्हर्स ठरल्या निर्णायक

Ind vs Sl t20 : श्रीलंका संघाने हा सामना 4 विकेट्सने जिंकला. त्यामुळे आता 3 सामन्यांची मालिका आता 1-1 ने बरोबरीत आली आहे.

Ind vs Sl t20 : भारत आणि श्रीलंकेमध्ये दुसरा टी-20 सामना काल कोलंबो येथे खेळवला गेला. आधी फलंदाजी करत भारतीय संघाने 5 विकेट्स गमावून 132 केल्या. त्यानंतर श्रीलंका संघाने हा सामना 4 विकेट्सने जिंकला. त्यामुळे आता 3 सामन्यांची मालिका आता 1-1 ने बरोबरीत आली आहे.

सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाची पकड मजबूत दिसत होती, परंतु शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये श्रीलंकेने सामन्याचे चित्र बदलले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच कालच्या सामन्यामध्ये भारताकडून 4 खेळाडूंचा International Debut सुद्धा झाला.

 

ज्यामध्ये ऋतुराज गायकवाड, देवदत्त पद्दीकल, नितीश राणा आणि चेतन सकारीया यांचे नाव आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 133 धावांचे आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले. ज्यामध्ये शिखर धवन (40) देवदत्त पद्दीकल (29) यांचे योगदान होते. तर भारतीय मिडल ऑर्डर पुन्हा एकदा अयशस्वी झाल्याचे दिसून आले. ज्यामध्ये नितीश राणा (9), संजू सैमसन (7) आणि भुवणेशवर कुमार (13) यांचा सामावेश होता.

फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात देखील काहीशी संथ गतिनेच झाली होती. परंतु शेवटच्या ओव्हर्समध्ये त्यांनी सामना आपल्या बाजूने फिरवला.
श्रीलंकेकडून आविष्का फेरनांडो (11), मिनोड भाणुका (36), सदिरा समरविक्रमा (8), दासून शनाका (कर्णधार) (3), धनंजय डीसिल्वा (40), हसरंगा (15), रमेश मेंडीस (2) आणि करुणारत्ने (12) अशा धावा केल्या.

भारताकडून चेतन सकारिया, भुवनेशवर कुमार, राहुल चहर, वरून चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 तर कुलदीप यादव ला 2 विकेट्स मिळाले. तेच श्रीलंकेकडून दुष्मंथा चमीरा, वनिन्दु हसरंगा, दासुन शनाका यांना प्रत्येकी 1, तर हसरंगाला 2 विकेट्स मिळाल्या. भारत-श्रीलंका यांच्यामधील तिसरा आणि अखेरचा निर्णायक टी-20 सामना आज रात्री कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments