blog

Ind vs Sl : मोठी बातमी; भारतीय संघाचा कर्णधार बदलणार

Ind vs Sl : टी-ट्वेंटी मालिकेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ind vs Sl : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी-ट्वेंटी मालिकेची श्रुंखला आयोजित करण्यात आली होती. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने श्रीलंकेचा 2-1 असा पराभव करून, मालिका आपल्या खिशात घातली आहे. परंतु आता टी-ट्वेंटी मालिकेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघाने टी-ट्वेंटीचा पहिला सामना जिंकून मालिकेवर आपली पकड मजबूत केली आहे. परंतु आता दुसऱ्या सामन्याच्या सुरुवातीलाच, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या कोविड पॉझिटीव्ह आढळल्यामुळे, आता भारतीय संघ अडचणीत सापडला आहे.
त्यामुळे आता कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेल्या 9 जणांना आता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, शिखर धवन या मालिकेमधून बाहेर पडला आहे. विलगीकरण झालेल्या खेळाडूंमध्ये धवनचे देखील नाव असल्यामुळे भारतीय संघाची कर्णधार पदाची धुरा भुवनेश्वर कुमारच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

टी-ट्वेंटी मालिकेतला दुसरा सामना मंगळवारी खेळवला जाणार होता परंतु या घटनेमुळे तोच सामना आज खेळवला जाणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार विलगीकरण केल्या गेलेल्या त्या खेळाडूंमध्ये कृष्णपा गौतम, ईशान किशन, सूर्याकुमार यादव, पृथ्वी शॉ, हार्दिक पांड्या यांचे देखील नाव शामील आहे.

सगळे फलंदाज मालिकेतून बाहेर झाल्यामुळे आता उर्वरित सामन्यांमध्ये, भारतीय संघाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

उर्वरित 12 खेळाडूंचा संघ :

भुवनेश्वर कुमार (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), मनीष पांडे, नितीश राणा, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, चेतन साकरिया, नवदीप सैनी.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments