आपलं शहर

JOURNEY FROM DOCTOR TO IAS : UPSC देण्यासाठी सोडली डॉक्टर ची पदवी….जाणून घ्या कारण.

JOURNEY FROM DOCTOR TO IAS :डॉक्टर ते IAS अधिकारी, थक्क करणारा प्रवास

JOURNEY FROM DOCTOR TO IAS : प्रत्येक कुटुंबात एकजण असा असतोच ज्याला आयएएस अधिकारी बनायचे असते. हे अजिबात सोपे नसले तरी, असे काही लोक आहेत, जे ही गोष्ट साध्य करतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे रेणू राज. त्या केरळमधील कोट्टायमची रहिवासी आहे आणि त्यांनी पहिल्याच प्रयत्नातून  यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली आहे. या परीक्षेत त्यांनी देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

renu raaj

रेणू यांनी सध्या एक मोठी कामगिरी केली आहे, आणि म्हणूनच त्या आज चर्चेत आहेत. जवळपास दहा महिन्यांच्या कारकिर्दीत रेणू राज यांनी मुन्नार हिल स्टेशनमध्ये बेकायदा बांधकाम आणि जमीन अतिक्रमणाविरूद्ध कठोरपणे कारवाई केल्याने त्या आज चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

1626508711786

कोण आहेत रेणू राज

रेणू राज यांनी आपले प्राथमिक शिक्षण केरळच्या कोट्टायम येथील सेंट तेरेसा उच्च माध्यमिक शाळेतून पूर्ण केले आणि त्यानंतर कोट्टयमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले.

1626508761961 copy 900x500 1

रेणू राज यांचा UPSC चा प्रवास

रेणू राज 2014 मध्ये यूपीएससी परीक्षा पास झाल्या आणि पहिल्या प्रयत्नातच दुसरा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी बनल्या. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यांच्याकडे आधीच वैद्यकीय पदवी होती.

रेणूंचे वडील निवृत्त सरकारी कर्मचारी असून आई गृहिणी आहे. रेणू यांची बहिणी आणि त्यांचा नवरा दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत.

1626508832992 copy 900x500

डॉक्टर ते आयएएसपर्यंतचा प्रवास

रेणू राज यांना लहानपणापासूनच आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्या शल्यचिकित्सक म्हणून काम करत असताना सामान्य लोकांसाठी काहीतरी करावे आणि त्यांचे जीवन अधिक चांगले करावे, अशी त्यांची इच्छा होती, मग त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

एका मुलाखतीत रेणू राज म्हणाल्या होत्या की, ‘मला वाटलं की डॉक्टर असल्याने ती 50 किंवा 100 रूग्णांना मदत करू शकली असती, पण सिव्हिल सर्व्हिस अधिकारी म्हणून काम करत असताना एका निर्णयामुळे हजारो लोकांना फायदा होईल. त्यानंतर, म्हणून मी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरविले. ”

मेडिकल सरावासोबत 2013 पासून रेणू राज दररोज 2/3 तास यूपीएससी परीक्षेसाठी अभ्यास करत असत. त्यांनी सुरुवातीला सात किंवा आठ महिने हे केले; पण नंतर त्यांनी याकडे पूर्ण वेळ देण्याचं ठरवलं. मेन्सच्या परीक्षेनंतरही रेणूने पुन्हा वैद्यकीय सराव सुरू केला, ज्यामुळे त्यांचा अभ्यासाचा कालावधी तीन-चार तासांनी कमी झाला, परंतु त्यांनी आपल्या तयारीवर परिणाम होऊ दिला नाही आणि अखेर आवडीच्या जोरावर रेणू यांनी आपलं यश संपादन केलच.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments