आपलं शहर

Kargil Vijay Diwas: भारतीय सैनिकांनी प्राणांचे बलिदान; पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 22 वर्ष पूर्ण

या युद्धात भारतीय सैन्याने (indian army) आपला सर्वोच्च पराक्रम दाखवला

Kargil Vijay Diwas  : आज कारगिल विजय दिवस आहे. दरवर्षी २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिन’  म्हणून साजरा केला जातो. भारताने युद्धात पाकिस्तानवर (indi-pakistan war) मिळवलेल्या विजयाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1999 साली कारगीलमध्ये 60 पेक्षा जास्त दिवस हे युद्ध चालले होते.

या युद्धात भारतीय सैन्याने (indian army) आपला सर्वोच्च पराक्रम दाखवला आणि पाकिस्तानला पळवून आपला देशातील भूभाग परत मिळवला होता.

भारतीय सैनिकांनी आपल्या पराक्रमाने आणि बलिदानाने घडविलेल्या त्या ऐतिहासिक क्षणांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच या युद्धात मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून देशभर गांभीर्याने साजरा करण्यात येतो. या युद्धात भारताच्या 550 वीर जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.

पंतप्रधान मोदी यांनी काल मन की बातमध्ये म्हटलं होतं की, 26 जुलै रोजी, कारगिल विजय दिवस आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पाहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे, असं ते म्हणाले. कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची जखम आहे. या दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांनी शहीद जवानांना अभिवादन केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments