फेमस

KARINA KAPOOR : करिना कपूरचा तो मुंबई लोकलमधील प्रवास, वाचा न ऐकलेला किस्सा

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर हिने एका मुलाखतीत सांगितले होते की ती आणि करिश्मा कपूरसोबत अनेकदा एकत्र राहायची. त्यावेळी त्यावेळी सामान्य मुंबईकरांसारखं त्या दोघी मुंबई लोकलने प्रवास करायच्या.

karina kapoor : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर हिने एका मुलाखतीत सांगितले होते की ती आणि करिश्मा कपूरसोबत अनेकदा एकत्र राहायची. त्यावेळी त्यावेळी सामान्य मुंबईकरांसारखं त्या दोघी मुंबई लोकलने प्रवास करायच्या.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान बहुतेकदा आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. करीना कपूर तिची मोठी बहीण करिश्मा आणि आई बबिता कपूर यांच्या अगदी जवळ राहायची. त्यांच्यात घडलेले अनेक किस्से ती आपल्या मुलाखतीमधून सांगत असते. आम्ही देखील सामान्य लोकांप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास केला आहे. करिना असेही म्हणते की एक काळ असा होता, जेव्हा तिच्या कुटुंबियांना ड्रायव्हर परवडत नव्हते, त्यावेळी स्वत: गाडी चालवून प्रवास करणे किंवा लोकलच त्यांना जास्त परवडत असे.20210713 133152

एका मुलाखतीदरम्यान करीना कपूरला एक प्रश्न विचारण्यात आला होता की तिचा चुलत भाऊ रणबीर कपूर यांच्याप्रमाणेच आपला जन्म लक्झरी वातावरणात झालाय, असं वाटतं का? यावर करिनाने उत्तर दिले की, ‘मला सुरुवातीपासून लक्झरी आयुष्य मिळाले नाही, जसे लोक कपूर परिवाराबद्दल विचार करतात. तसं मुळीच नाही. माझी आई बबिता आणि बहीण करिश्मा यांनी खरोखरच मला चांगले आयुष्य देण्यासाठी संघर्ष केलाय. विशेषत: माझ्या आईने मला सुख मिळावं म्हणून खूप कष्ट घेतले आहेत. एक अविवाहित असल्यामुळे आमच्यासाठी सर्व काही मर्यादित होतं, तरीदेखील आम्ही खूप काही केलं.20210713 133221

करीना कपूर पुढे म्हणते की, ‘मी लोकल ट्रेनमधून कॉलेजमध्ये जात असे. मी इतर सर्वांप्रमाणेच स्कूल बसने जात होती. आमच्याकडे कार होती होती, मात्र ड्रायव्हरला देण्याइतके पैसे आमच्याकडे नव्हते. आईने मला अशा प्रकारे उभे केले आहे की आज आपल्याकडे जे आहे, त्या सर्व गोष्टींना आपण मोठे महत्त्व देतो. आम्ही खूप वाईट दिवस पाहिले आहेत.   20210713 133409

करीना आज दोन मुलांची आई आहे. या वर्षाच्या सुरुवातीला करीना कपूर खानने तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. अलीकडेच रणधीर कपूरने करीनाच्या मुलाचे नाव येह असे ठेवले आहे. करीना आणि सैफ यांच्यासह त्यांचा चार वर्षांच्या मुलगा तैमुरचीही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख आहे.20210713 133324

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments