आपलं शहर

KDMC ROAD ACCIDENT:व्हॅक्सिन घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा रस्त्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू

KDMC ROAD ACCIDENT:दिव्या आणि तिचा दीर अर्जुन कटारिया हे दोघे कारोनाची लस (vaccine) घेण्यासाठी घरून निघाले

KDMC ROAD ACCIDENT :राहुल कटारिया त्यांच्या पत्नी दिव्या कटारिया सोबत कल्याण पश्चिमच्या गांधारी परिसरातील रितू कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. राहुल आणि दिव्या हे दोघं शिक्षक होते, दिव्या ही अकरावी आणि बारावीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत होती.

दिव्या आणि तिचा दीर अर्जुन कटारिया हे दोघे कारोनाची लस (vaccine) घेण्यासाठी घरून निघाले, पण रस्त्यात त्यांना लक्षात आले की त्यांच्या दुचाकी (scooty) मध्ये पेट्रोल कमी आहे, पेट्रोल भरण्यासाठी बापगाव येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले, रस्त्यात त्यांनी एका ट्रकला ओव्हरटेक केले आणि पुढे एक पाण्याने भरलेल्या खड्ड्यात त्यांची गाडी स्लीप झाली, या घटनेत दिव्या गंभीर जखमी झाली तिच्यावर ४ दिवसापासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर दिव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेची कोणती ही पोलिसात तक्रार करण्यात आली नाही आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments