आपलं शहरकारण

KIDNAPPING : 3 खानांना भेटवणाऱ्याचा कट उधळला, तरुणी सुखरूप

KIDNAPPING : कोलकत्याहून एका मुलीला बॉलीवुडचा किंग शाहरुख खान, सलमान खान, अमिर खान यांना भेटवण्याच्या बहाण्याने मुंबईत आणणाऱ्या व्यक्तीस रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

KIDNAPPING : कोलकत्याहून एका मुलीला बॉलीवुडचा किंग शाहरुख खान, सलमान खान, अमिर खान यांना भेटवण्याच्या बहाण्याने मुंबईत आणणाऱ्या व्यक्तीस रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

दादर जीआरपी मधून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुभान शेख आणि पीडित मुलगी त्यांची ओळख एक वर्ष आधीच फेसबुक वरून झाली होती. आरोपीने फेसबुक अकाउंटवर 20 वर्षीय तरुणाचे फोटो लावले होते आणि आपल्या प्रोफाईलमध्ये मोठ मोठ्या कलाकारांसोबत आपले फोटो लावले होते, जेणेकरून आपण मोठमोठ्या कलाकारांना भेटतो, आशी फेक प्रोफाइल त्याने बनवली होती.

एक वर्षांपूर्वी सुभान शेख आणि पीडित मुलगी यांची ओळख फेसबुकवर झाली होती. ओळख झाल्यानंतर अल्पवयिन मुलगी आणि आरोपी यांनी फेसबुकवर चॅटिंग करायला सुरुवात केली आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. यादरम्यान आरोपीने अल्पवयिन मुलीला शाहरुख खानसोबत भेटण्यासाठी विचारले, असता मुलगी हो म्हणाली आणि आरोपी मुलीला फसवण्यात यशस्वी झाला.

पीडित मुलगी आपल्या परिवारासोबत कलकत्त्याहून दीडशे किलोमीटर लांब पळशीपरा या भागामध्ये राहते, तर आरोपीचे वय 43 वर्ष असून सुभान शेख हा मिरारोड येथील रहिवसी आहे. 15 जुलै रोजी आपली मुलगी आपल्या घरी नाही पोहोचली, तेव्हा तिच्या घरातल्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी हावडा ते मुंबईकडे जाणारी ट्रेनचे सीसीटीव्ही चेक केले असता मुलगी त्या ट्रेनमध्ये असल्याचे त्यांना कळाले आणि त्यांनी लगेचच तात्काळ दादर जीआरपीसोबत संपर्क साधून ही माहिती दिली.

आरोपीने मी बाहेर असल्याचे सांगून माझे वडील तुला घ्यायला येतील, असा कट रचून तिला भेटण्यास गेला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा संपूर्ण प्लॅन फसला आणि आरोपी जाळ्यात सापडला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments