खूप काही

lAS transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱअयांची बदली, पाहा कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश

राज्य शासनाने शुक्रवारी 14 आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. प्रशासकीय कामाचा भाग म्हणून नियमित बदल्यांच्या प्रक्रियेला राज्य सरकारने निश्चित कालमर्यादा दिली आहे.

IAS transfer : राज्य शासनाने शुक्रवारी 14 आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. प्रशासकीय कामाचा भाग म्हणून नियमित बदल्यांच्या प्रक्रियेला राज्य सरकारने निश्चित कालमर्यादा दिली आहे. सेत्यामुळे या कालावधीत वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आलाय.

राज्यातील 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेनुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. अकोला महापालिकेचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांची बदली हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून केली आहे. अकोल्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्यात ज्येष्ठतेचा निर्माण झालेला वाद सोडविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे :

1. कुमार खैरे – सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.

2. प्रताप जाधव – उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.

3. एस जी देशमुख – अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.

4. सुरेश जाधव – आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.

5. अनिल पाटील – व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

6. संजय दैने – अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका

7. जी एम बोडके –  सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.

8. रुचेश जयवंशी – जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.

9. एम देवेंद्र सिंह – संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.

10. राहुल कर्डिले – सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.

11. दीपेंद्रसिंह कुशवाह – आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर.

12. जी एस पापळकर  – जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.

13. एन आर गटणे – महापालिका आयुक्त, नांदेड या पदावर.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments