खूप काही

GUTAM ADANI :स्थानिकांना मिळणार रोजगार, मुंबई विमानतळाचं काम अदानी ग्रुपकडे टेकओव्हर

गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळचे (Mumbai Internation Airport) काम ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

Gutam Adani : गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळचे (Mumbai Internation Airport) काम ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. खुद्द गौतम अदानी यांनी मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून अदानी ग्रुप विमान क्षेत्रात आपली पकड मजबूत करीत आहे, त्याचाच एक भाग म्हणजे मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेणे होय.
‘वर्ल्ड क्लास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन ताब्यात घेतल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. मुंबईला अभिमान वाटण्याचे आमचे वचन आहे. अदानी ग्रुप व्यवसाय, लक्झरी आणि करमणुकीसाठी भविष्यातील विमानतळ परिसंस्था तयार करेल. आम्ही हजारो स्थानिकांना नवीन रोजगार देखील देऊ, असं मत अदानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडलं आहे.


देशातील प्रमुख विमानतळांचे व्यवस्थापन खासगी हातात देण्यासाठी केंद्र सरकारने वर्ष 2019 मध्ये निविदा मागविली होती. त्यानंतर अदानी समूहाकडे अहमदाबाद, लखनऊ, जयपूर, मंगलुरू, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांचे व्यवस्थापन आणि संचालन झाले होते. ग्रुपची 100% उपकंपनी असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) ने जीएमआरसारख्या बड्या कंपन्यांना मागे टाकत 50 वर्षे या विमानतळांचे संचालन करण्याचा ठेका स्वत:कडे घेतला आहे.
अदानी ग्रुपची सहाय्यक कंपनी AAHL आता देशातील सर्वात मोठी विमानतळ कंपनी बनली आहे. मुंबई विमानतळ मिळाल्यानंतर आता कंपनीला एकूण हवाई विमानतळांचे व्यवस्थापन मिळाले आहे. तसेच, येत्या महिन्यापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम सुरू होईल. या विमानतळाचे काम 2024 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहितीही अदानी द्यायला विसरले नाहीत

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments