खूप काही

Maharashtra 2021 SSC Results: असा पाहा 10 th चा online निकाल, पाहा काय आहे प्रोसेस

आज (16 जुलै रोजी) दुपारी एक वाजता दहावीचा (SSC Result) ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे.

Maharashtra 2021 SSC Results : आज (16 जुलै रोजी) दुपारी एक वाजता दहावीचा (SSC Result) ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे.

करोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची घडीच विस्कटली असून, राज्य सरकारकडून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यानंतर विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या निकषांआधारे जाहीर करणार याबाबत चर्चा सुरू झाली. विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीमध्ये असताना पार पडलेल्या शालेय परीक्षा तसेच, दहावीत पार पडलेल्या शालेय परीक्षेत मिळालेले गुण लक्षात घेऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भातली माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सविस्तर माहिती दिली आहे.

बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल.

असा तपासा तुमचा निकाल (Check How To Know Your result)

या अधिकृत निकाल वेबसाइटला भेट द्या

maharashtraeducation.com

 http://result.mh-ssc.ac.in

 http://mahahsscboard.in

  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
  •  त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
  •  त्यानंतर खालच्या रखान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.
  • म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल.
  •  तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
  • यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे.
  • तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments