आपलं शहर

Maharashtra Flood’s:महाराष्ट्रभर पावसाची काय अपडेट, वाचा एका क्लिकवर

Maharashtra Flood's:मुंबई, पुणे, रायगडमध्ये जोरदार पाऊसामुळे भूस्खलनच्या अनेक घटना घडल्या आहेत, महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसापासून 84, 452 लोकांचं स्थलांतर सुरक्षित भागात करण्यात आलं आहे

Maharashtra Flood’s:मुंबई, पुणे, रायगडमध्ये जोरदार पाऊसामुळे भूस्खलनच्या अनेक घटना घडल्या आहेत, महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसापासून 84, 452 लोकांचं स्थलांतर सुरक्षित भागात करण्यात आलं आहे. असा पावसाचा कहर गेल्या 20 वर्षांनंतर जुलै महिन्यात पहिलीवेळ झाला आहे.

गुरुवारी रायगड जिल्ह्यात भूस्खलनात 38 लोकांचा मृत्यू झाला, तर एकूण घटनांमधून तब्बल 129 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

भूस्खलनच्या व्यतिरिक्त अनेक लोकांचा जीव पाण्यात वाहून गेल्याने झाला आहे, अधिकृत आकड्यांनुसार फक्त साताऱ्यात 27 लोकांचा जीव पाण्यात वाहून गेल्याने झाला आहे. रायगड जिल्ह्यातील भूस्खलन गुरुवारी सायंकाळी महाड तहसीलमधील तलाई गावाजवळ झाले. एनडीआरएफचे पथक आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी महाडमध्ये बचावकार्य सुरु केले आहे.

सातारा पाटण तहसीलमधील आंबेघर आणि मीरगाव या गावातही गुरुवारी रात्री दरड कोसळल्यामुळे एकूण 8 घरे पुरण्यात आल्याची माहिती सातारा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली. परंतु अधिकाऱ्यांद्वारे आतापर्यंत झालेल्या दोन घटनांमध्ये कोणत्याही मृत्यूंची माहिती समोर आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे सुमारे 10 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त चिकोडी नदीत बस अडकली होती, त्यातून आठ नेपाळी कामगारांसह अकरा जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना भुदरगड तहसीलमधील पांगिरे गावात पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments