खूप काही

MANIKRAO JAGTAP : कोण होते माणिकराव जगताप, निधन झाल्याने संपूर्ण काँग्रेस हळहळलं

माणिकराव जगताप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रविवारी मध्यर्त्रीच्या सुमारास त्यांचे मुंबईत निधन झाले.

Manikrao Jagtap : आमदार माणिकराव जगताप यांच्यावर रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी सोवण्यात आली. 1999 मध्ये ते राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, परंतु पुन्हा ते काँग्रेसमध्ये परतले होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षला कायम  जिवंत ठेवण्याचे काम जगताप यांनी केले आहे.

जगतापांनी राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी काँग्रेसमधून केली होती. त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसमध्ये अनेक पदेदेखील भूषवल्याची माहिती आहे. महाड नगरपालिकेवर 15 ते 20 वर्ष त्यांचे वर्चस्व होते आणि महाड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आले. माणिकराव जगताप हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष होते. दक्षिण रायगडमध्ये प्रचंड जनमत असलेला काँग्रेसचा मोठा नेता म्हणून माणिकरावांची ओळख आहे.

मात्र काही दिवसांपूर्वी माणिकराव जगताप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रविवारी मध्यर्त्रीच्या सुमारास त्यांचे मुंबईत निधन झाले. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. ते 54 वर्षाचे होते. आज दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments