खूप काही

Mary kom : मेरी कोमचा प्रवास थांबला, शेवटचा प्रवासही ठरला अपयशी

भारताची स्टार बॉक्सर असलेली एमसी मेरी कोम हि सहा विश्विजेतेपद जिंकणारी भारताची अव्वल अशी बॉक्सर आहे. परंतु मेरी कोम हिला टोकियो ऑलिम्पिकमधून मोकळ्या हातांनी भारतात परत यावे लागणार आहे.

Mary kom :भारताची स्टार बॉक्सर असलेली एमसी मेरी कोम हि सहा विश्विजेतेपद जिंकणारी भारताची अव्वल अशी  बॉक्सर आहे. परंतु  मेरी कोम हिला टोकियो ऑलिम्पिकमधून मोकळ्या हातांनी भारतात परत यावे लागणार आहे. काल (29जुलै)सातव्या दिवशी  झालेल्या महिलांच्या  51 किलो वजनी गटातील 16व्या फेरीच्या सामन्यात एमसी मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना वॅलेन्सियाशी झाला.परंतु  उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये चांगला पराक्रम करून देखील पराभवाला सामोरं जावं लागलं.कोमला कोलंबियाच्या खेळाडूकडून 2-3 असा पराभवाचा सामना करावा लागला.

जागतिक टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज सातव्या दिवशी पार पडलेल्या 51 किलो वजनी गटातील 16 व्या फेरीच्या सामन्यात भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमने चांगलीच झुंज दिली. तर या सामन्याच्या पहिल्या फेरीत मेरी कोमला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. पण दुसर्‍या फेरीत मेरी कोमने 3-2 असा विजय मिळवला.

पहिल्या फेरीत मेरी कोमने बचाव करत झुंज दिली,तर दुसर्‍या फेरीत तिने आक्रमक खेळ दाखविला. मात्र, मेरी कोमला तिसर्‍या फेरीत 2-3 असा पराभव स्विकारावा लागला. यासह बॉक्सिंगमधील भारताच्या पदकांच्या आशा देखील संपुष्टात आल्या.भारताकडून पदकाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मेरी कोमला सामन्यात वॅलेन्सियाने 3-2 ने पराभूत केले.या पराभवामुळे मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडलीय आहे.या पराभवामुळे सर्व भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. मेरी कोमकडून सर्वांना पदकाची अपेक्षा होती.

परंतु पराभूत होऊन देखील मेरी कोमने कोणत्याही प्रकारची निराशा न दाखवता, मोठ्या मनाने वॅलेन्सियाचे मोकळ्या मनाने अभिनंदन केले.आणि मेरी कोमने यावेळी माझ्या कारकिर्दीतील हा शेवटचा ऑलिम्पिक खेळली असल्याचे देखील तिने सागितलं.मेरी कोमच्या  पराभवानंतर आता महिलांच्या यादीत पूजा राणी, लव्हलिना बोगो‌हेन आणि सिमरनजित कौर यांच्यावरच भारताच्या आशा टिकून आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments