खूप काही

Mumbai update :म्हाडाचे आरक्षित भूखंड पालिकेच्या पदरात, होणार नव्या कामांची घोषणा

म्हाडाने शहर आणि उपनगरातील सुमारे 80 भूखंडांची यादी तयार केली आहे. यामुळे आरक्षित भूखंडावर विविध विकास कामांसाठी (developments) निधी खर्च करण्यावरून नगरसेवक आणि आमदारांमध्ये होणाऱ्या वादांवर पडदा पडणार आहे.

Mumbai update : मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार म्हाडा वसाहतीमधील आरक्षित भूखंडात असलेली खेळाची मैदाने, उद्याने आदी भूखंड महापालिकेकडे सोपवणे आवश्यक आहे. त्यानुसार म्हाडाने आपल्या हद्दीतील भूखंड महापालिकेच्या ताब्यात तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाने शहर आणि उपनगरातील सुमारे 80 भूखंडांची यादी तयार केली आहे. यामुळे आरक्षित भूखंडावर विविध विकास कामांसाठी (developments) निधी खर्च करण्यावरून नगरसेवक आणि आमदारांमध्ये होणाऱ्या वादांवर पडदा पडणार आहे.

नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता म्हाडा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील म्हाडा वसाहतींमध्ये मलनिःसारण वाहिन्या, जलवाहिन्या, रस्ते दुरुस्ती, आदी मूलभूत सुविधा महापालिकेमार्फतच पुरविल्या जातील, असा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने म्हाडाला स्वतंत्र नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरातील म्हाडा वसाहतींमध्ये महापालिकेतर्फे मलनिःसारण, वाहिन्या, जयवाहिन्या जोडणी, रस्त्यांची दुरुस्ती इत्यादींसारख्या मूलभूत सुविधा देण्यास नकार दिला होता.

तसेच इतर भूखंडांचीही माहिती जमा करण्याचे काम सुरु असून यासाठी सतत बैठकांचा जोर वाढला आहे. तात्पुरत्या स्वरूपात हे भूखंड पालिकेच्या ताब्यात देणार आहे. म्हाडाकडे असलेल्या या भूखंडांवर नगरसेवक आणि आमदार निधीतून कामे करण्यासाठी चढाओढ लागत होती. मात्र आता हे भूखंड महापालिकेच्या ताब्यात जाताच लोकप्रतिनिधींमध्ये होणारे वाद थांबणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments