खूप काही

JITENDRA PATIL : Manse नेत्यांनी घेतली रावसाहेब दानवेंची भेट, केली मोठी मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व स्थानिक भुमिपुत्रांच्या हिताकरीता महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी आज रेल्वे राज्य मंत्री श्री रावसाहेब दानवे यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली व शुभेच्छा दिल्या.

jitendra patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व स्थानिक भुमिपुत्रांच्या हिताकरीता महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी आज रेल्वे राज्य मंत्री श्री रावसाहेब दानवे यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली व शुभेच्छा दिल्या. तसेच रेल्वे कामगारांच्या विविध समस्यांसंदर्भात त्यांनी त्यावेळीं त्यांच्या सोबत चर्चा केली, आणि रेल्वे कामगारांना फ्रंटलाईन वर्कर चा दर्जा देण्यात यावाअशी मागणी त्यांच्या कडून करण्यात आली.

स्थानिक भूमिपुत्रांना रेल्वे भरतीमध्ये डावलण्यात येत असून आर आर बी (RRB)मुंबईमधील प्रतिक्षा यादीतील ए एल पी /टेकनिशियन उमेदवारांना रेल्वे सेवेत सामावून घेण्यात यावे तसेच लसीकरण झालेल्या नागरीकांना लोकल रेल्वेच्या प्रवासाची मुभा दिली जावी. यासंदर्भात निवेदन दिले व चर्चा झाली त्यावर मंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कारवाई करत तसेच पाऊले उचलली जातील, असे आश्वासन त्यांच्या कडून देण्यात आले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments