आपलं शहर

Monsoon 2021:मुंबई ते चिपळूण; महाराष्ट्रभर मुसळधार, पाहा काय आहे सगळीकडची परिस्थिती

Monsoon 2021:राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Monsoon 2021:राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे, 840 मिमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण 1 जुलै ते 21 जुलैदरम्यान सांताक्रुज येथे 1032.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या काळात कुलाबा परिसरात सरासरी 761.6 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. दरम्यान गुरुवारीही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईतही ऑरेंज अलर्टनंतर रेड अलर्ट देण्यात आला आहे, मुंबई, पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भातील काही भागात अतिवृष्टीचा इशारासुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

महाडमध्ये पहिला बळी

महाडच्या रोहिदास नगर या भागातील रहिवाशी संजय नारखेडे यांचा पुर पाहत असताना तोल जाऊन गच्चीवरून पडून मृत्यू झाला आहे, महाडाच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मुसळधार पावसाचा पश्चिम महाराष्ट्र ते कोकणात जाणाऱ्या रस्त्यांना फटका बसला आहे. वैभववाडी-मांडकुलीमध्ये झालेल्या जोरदार पावसाने गगनबावडा – कोल्हापूर मार्ग पणीमाय झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र ते कोकण वाहतूक पूर्णपणे बंद आहे. सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुडाळ तालुक्यातील ब्रिटिशकालीन आंबेरी पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. वैभववाडी तालुक्यातील करूळ व भुईबावडा घाट मार्गाने होणारी वाहतूक बंद आहे.

लोणावळा

लोणावळ्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, गेल्या 24 तासात तब्बल 390 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे, अनेक सखल भागात पाणी साचलं होतं, पाणी देखील शिरलं होतं, ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, अशी माहिती टाटा धरण प्रमुख यांच्याकडून देण्यात आली आहे, 3-4 तासात तब्बल 150-175 मिमी पाऊस झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

चिपळूण

चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर आहे, अनेक लोक त्यांच्या घरांमध्ये अडकलेले आहेत. अनेक ठिकाणी 10 फुटांच्या वर पाणी साचल्याने मदत करणेही अडचणीचे झालं आहे. चिपळूण अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याने मोठी भिषण परिस्थिती नागरिकांसाठी निर्माण झाली आहे.

नाशिक

नाशिकमधून जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलं आहे आणि इगतपुरीमध्ये अडकलेल्या प्रवाशांनासुद्धा बसद्वारे कसारा आणि इतर ठिकाणी सोडण्यात आलं आहे, पावसामुळे पंचवटी राज्यराणी एक्सप्रेससुद्धा रद्द करण्यात आली आहे.

संगमनेर

संगमनेरमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे, संगमेश्वर बाजारपेठमध्ये पाणी शिरले आहे आणि रामपेठमधील घरांमध्येसुद्धा पाणी शिरलं आहे.

कल्याण डोंबिवली

कल्याण – डोंबिवलीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले आहे, यामुळे जल शुद्धी केंद्राचे कामकाज ठप्प झाले आहे, या कारणामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments