खूप काही

Monsoon update : 213 जणांचा मृत्यू, वाचा राज्यात नेमकं कशाकशाचं नुकसान झालं

गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात आर्थिक सामाजिक गोष्टीची हानी झालेली असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली आहे.

Monsoon update :गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात आर्थिक सामाजिक गोष्टीची हानी झालेली असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली आहे. गेल्या आठवड्यातील कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 213 वर पोहोचली असून अजूनही आठ जणांचा शोध लागलेला नाही शोध कार्य सुरू आहे.

52 जण जखमी आहेत, तर अतिवृष्टीमुळे कोकणातील बाराशे पाच गावांना फटका बसला आहे. राज्यात पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 300 वर पोहोचलेली आहे. राज्यभरात 100 जण जखमी झाले असून विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराचा मोठा फटका बसला होता. सध्या जिल्ह्यात पाऊस कमी झाला असून पुराचे पाणी ओसरले असून तेथील जनजीवन हळुवारपणे पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून 70 पेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

सध्या या भागात मदतकार्य वेगाने सुरू असून हळुवार जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र आता पुन्हा पाच दिवसात याच भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

राज्यात आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीचा फटका 2556 गावांना बसला आहे. तसेच दरडी कोसळून व पुरामध्ये 213 लोकांचा मृत्यू झाला असून 742 जनावरांसोबत 62 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आणि त्यासोबतच कोकणातील 8 हजार 267 हेक्‍टरवरील शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments