खूप काही

Mumbai 2021 SSC Results : काय आहे राज्यात 10 वीची परिस्थिती, पाहा A to Z दहावीचा निकाल…

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल तयार करण्यात आला आहे.

Mumbai 2021 SSC Results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता पाहायला मिळेल. http://result.mh-ssc.ac.in/ आणि https://mahahsscboard.in/

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल तयार करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात गुरुवारी माहिती दिली.

राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, यामध्ये मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के इतका आहे.

2020-21 वर्षातील एसएससी SSC परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. त्यापैकी 15 लाख 75 हजार 900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 9 लाख 09 हजार 931 मुलांचा समावेश असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. असं असूनही यावर्षीही मुलींची गुणवत्ता नेहमीप्रमाणे अधीक आहे.

राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहे.

(Out of the regular passing students in the state, 6 lakh 48 thousand 683 students have passed in the first class.)

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार

मुलांचा निकाल 99.94 टक्के

मुलींचा निकाल 99.96 टक्के

राज्यातील एकूण 12 ,384 शाळांचा निकाल 100% लागला आहे.

5.086% विद्यार्थींना 90 टक्क्यांहून अधिक गुण आहेत

4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून मागील तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments