आपलं शहरखूप काही

Mumbai Covid News : फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रदर्शन करणे पडले महागात, BMC चे लेटर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात निर्बंध जाहीर केले आहेत.

Mumbai Covid News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रेक चैन अंतर्गत आदेश दिले आहे, त्या आदेशानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात निर्बंध जाहीर केले आहेत. अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली नाही. मात्र या पार्श्वभूमीवर सरकारी आदेशाकडे दुर्लक्ष करून पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रदर्शन सुरु होती, म्हणजे राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे, त्यामुळे BMC ने हे प्रदर्शन लवकर थांबवावे, अशी मागणी FRTWA कडून करण्यात आली. (mumbai covid news expensive to display in five star hotel bmcs letter)

एफआरटीडब्ल्यूएने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 8 या दरम्यान इंडियन वेडिंग एक्सपोच्या माध्यमातून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते,

FRTWA नुसार रविवारी सकाळी 10 ते रात्री 8 या दरम्यान ‘इंडियन वेडिंग एक्सपो’ नावाचे प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्षण थांबवण्यासाठी  बीएमसीला सागण्यात आलं होतं.

“आमच्या पथकाने या जागेची पाहणी केली आणि तातडीने कार्यक्रम थांबवले आणि हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध पुढील कारवाई सुरू केली आहे.” असं मत आता BMC अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आलं आहे.

उपनगरात याच पद्धतीने कोरोनाचा नियमांचे उल्लंघन केले जात आहे, यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतील, परिणामी यावर काळजी म्हणून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeary,)  यांच्यासह महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे असे पत्र देखील देण्यात आले. अशी माहिती फेडरेशन ऑफ रिलेटेड ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा ( Viren Shah) यांनी दिलेली आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments