आपलं शहर

Mumbai Crime :मॉडेलला फेक इंस्टा अकाऊंटवरून त्रास, पाठवली चक्क बंदूकवरून धमकी…

वांद्रे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime :मुंबईतील मॉडलला (Mumbai model) सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल, धमकीचे मॅसेज, ब्लॅकमेलिंगचे मॅसेज केले जात होते. त्यामुळे संबंधित मॉडेलने वांद्रे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. (Bandra police )

बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून धमकीचे मॅसेज पाठवणे, मारण्याची भिती दाखवणे आणि अनेक प्रकारच्या गोष्टी तिच्यासोबत केल्या जात होत्या. हे सगळं काही दिवसांपूर्वी फेसबूकवर सुरु असल्याने संबंधित मॉडेलने आपलं फेसबूक अकाउंट डिलीट केलं होतं, अकाऊंट डिलीट केल्यानंतर तो त्रास संपला नाही, तर इंन्स्टाच्या माध्यमातून तो त्रास आणखी वाढला, असं मत संबंधित महिला पोलिसांना माहिती देताना मांडत होती.(Instagram, Facebook

इंन्स्टाग्रामवर @bitchurdead887 @terimaak231_ अशी अनेक बनावट खाती आहेत, ज्यांच्यामाध्यमातून महिलेला धमकीचे मॅसेज येत होते. या प्रकरणात बॉलीवूडचे फोटोग्राफर, कलाकार यांचा समावेश असल्याचंही समोर येत आहे, मात्र त्यांच्याविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही, 26 मे रोजी पोलिसांत तक्रार नोंदवूनदेखील अद्याप तिला पोलिसांकडून सहकार्य झालं नसल्याचं मत ती महिला सांगत आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर निकम यांनी या प्रकरणातील काहीशी माहिती दिली आहे. महिलेला त्रास देण्यासाठी सुरु केलेली बनावट इन्स्टा अकाऊंट ब्लॉक करावी लागली आहेत. फेक अकाऊंट कोण हँडल करत होतं, याचा तपास अद्याप लागलेला नाही, मात्र महिलेने दिलेल्या माहितीनुसार अनेकांना समन्स पाठवण्यात आले आहेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments