आपलं शहर

Mumbai Crime News मुंबईतील ATM चोरण्याचा डाव हैदराबादमधून उधळला, चोर फसले..

एटीएममध्ये लावलेल्या सर विलन सिस्टमच्या माध्यमातून कंट्रोल रूमला माहिती मिळाली.

Mumbai  Crime News : गोरेगाव पूर्व (E) येथील संतोष नगरमधील मंत्री पार्कच्या समोर एसबीआय बँकचे एटीएम (ATM) लुटण्याचा प्रयत्न काही आरोपी करत होते. परंतु एटीएममध्ये लावलेल्या सर विलन सिस्टमच्या माध्यमातून हैदराबाद कंट्रोल रूमला (control room)  ही माहिती मिळाली.

दींडोशीमधील संतोष नगर भागातील एटीएम मशीन लुटण्यासाठी आलेले आरोपी तोडफोड करत असल्याचे हैदराबाद कंट्रोल रूमने दिंडोशी पोलिसांना (dindoshi police )   फोनद्वारे कळवले. एटीएम मशीनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही सर्विलान्स यंत्रणेमुळे याची माहिती हैदराबादस्थित बँकेच्या कन्ट्रोल रुमला मिळली.

ही माहिती कळताच दिंडोशी पोलीस लगेच एटीएमच्या ठिकाणी पोहोचले, तेथे एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न काही जण करत होते. तर अन्य दोन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्वरित पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या एका आरोपीचे नाव हितेश गुप्ता असून त्याचे वय 21 वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित घटना 3 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.’

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments