आपलं शहर

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प….

Mumbai- Goa Highway : कुडाळ येथील माणगाव परिसरात रात्री उशिरा झालेल्या ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक ठीकाणी रस्त्यावर पाणी साचल्याची घटना घडली आहे

Mumbai- Goa Highway : कुडाळ येथील माणगाव परिसरात रात्री उशिरा झालेल्या ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक ठीकाणी रस्त्यावर पाणी साचल्याची घटना घडली आहे. माणगाव खोऱ्यातील सर्वच नंद्याना पुर आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

जरी पावसाने आता विश्रांती घेतली असलीतरी अनेक ठीकाणी सकलभागात पाणी साचले आहेत. बहुतेक ठिकाणी विद्युतपुरवठा देखील खंडित झालेला आहे.

माणगाव परिसरातील निर्मला नदी काठच्या भागात पाणी शिरल आहे. निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला मोठा पूर आल्याची घटना घडली आहे.

कुडाळ मधील पावशी गावालादेखील मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तेथील कर्ली नदीला पूर आल्यामुळे पाणी पवशी गावात शिरले आहे

महाडेश्वर वाडीत मुसळधार पावसामुळे सात घरे पाण्याखाली गेली असून मुंबई गोवा महाार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments