खूप काही

Mumbai Local: वकिलांचा लोकल ट्रेन ने प्रवास संदर्भात, मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सर्वसामान्यांसाठी अजून सुद्धा बंद आहे यात आता जुलै अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी हायकोर्टाने लोकल ला परवानगी देण्यास नकार दिला

Mumbai local : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सर्वसामान्यांसाठी अजून सुद्धा बंद आहे यात आता जुलै अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी हायकोर्टाने लोकल ला परवानगी देण्यास नकार दिला आता केवळ अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतरांना लोकल प्रवास करण्याची परवानगी दिली नाहीये. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अनेक संघटना मुंबई लोकल ट्रेन ने प्रवासाची मागणी सरकारकडे करत आहे. वकिलांनीही लोकलने प्रवास करण्याची परवानगी मागितली होती. त्याबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महाराष्ट्र सरकारला विचारणा केली होत.

त्या संदर्भातच मुंबई उच्च न्यायालयाने वकिलांना लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटलं की, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत वकिलांना मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.कारण महाराष्ट्र राज्याच्या कोविड संबंधित टास्क फोर्सने कोरोनाची वर्तवली आहे.”

याआधी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने वकिलांच्या लोकल प्रवास करण्याच्या परवानगी संदर्भात महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला विचारणा केली होती. या याचिकेत वकिलांना न्यायालय आणि कार्यालयात जाण्यासाठी लोकल ट्रेन आणि मेट्रोतून प्रवास करण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती.मात्र आता जुलै अखेरपर्यंत वकिलांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नकारली आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments