आपलं शहर

Mumbai Local:चोराला पकडण्याच्या नादात महिलेने मारली ट्रेनमधून उडी

Mumbai Local:चोरट्यापासून मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न करत असताना ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे.

Mumbai Local:चोरट्यापासून मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न करत असताना ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. एका 30 वर्षीय महिलेने तिच्या जिवावर खेळून आरोपीचा पाठलाग करत असताना महिलेने चालत्या लोकलमधून उडी मारली होती, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली असून आरोपी मात्र फरार झाला होता. अखेर आरोपीला सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

स्नेहल हुल्के असे दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. स्नेहल हुल्के या विरार मध्ये रहातात, त्या नुकत्याच पश्चिम रेल्वेमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम करतात. कामावर येण्यासाठी त्यांनी बुधवारी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांची विरारमधून लोकल ट्रेन पकडली होती.

कसा घडला प्रसंग?

कोरोनामुळे संपूर्ण महिला डब्बा रिकामी होता, सर्व सामान्यांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यास मनाई असल्यामुळेदेखील डब्बा पूर्णपणे रिकामा होता. ट्रेन दादर स्टेशनला पोहोचली, तेव्हा आरोपी पहिल्यापासून तयारीत होता, तो ट्रेनमध्ये चढला आणि मोबाईल हिसकावून पळ काढला.

17 हजारांचा मोबाईल वाचवण्यासाठी आरोपीच्या पाठोपाठ स्नेहलनेसुद्धा चालत्या गाडीतून उडी मारली, पण तेवढ्या वेळात गाडी प्लॅटफॉर्मच्या पुढे निघून गेली होती आणि स्नेहल खाली पडली.

स्नेहल गंभीर जखमी झाली, तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या गोष्टीची माहिती मिळताच मुंबई सेंट्रल पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पूर्ण प्रसंगाची माहिती घेतली. अखेर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली, आरोपीचं नाव राहुल बुटिया असून तो 25 वर्षाचा तरुण आहे, आरोपीला दादर मधून अटक करण्यात आली आहे.

आरोपीकडून स्नेहलचा मोबाईल जप्त करण्यात आला, सध्या स्नेहलवर जगजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन पहिले चोर चोरी करायचे; पण आता कोरोनामुळे लोकल ट्रेनमध्ये गर्दी नसते, याचा फायदा उचलून चोरीचे प्रमाण वाढत आहे, ते प्रवाशांचे सामान खेचून चालू ट्रेनमधून उडी मारून पळून जातात, या घटनांमुळे रेल्वे पोलिसांनी सर्व प्रवाशांना सावध केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments