आपलं शहर

Mumbai Local Trains : मुंबईकर भडकले, फक्त प्रसिद्धीसाठी काहीही विधाने करू नका…

Mumbai Local Trains : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते.

Mumbai Local Trains : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यातलाच एक भाग म्हणून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद करण्यात आला होता. साहजिकच यामुळे मुंबईबाहेरून येणाऱ्या लाखो नागरिकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. परिणामी लोकलसेवा कधी सुरू होणार याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत, तरी प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने राज्य सरकार लोकल सुरु करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत नसल्याचं दिसून येत आहे.

अशावेळी राज्यातील काही मंत्री मात्र कोणतीच ठोस माहिती नसताना विनाकारण लोकल आज सुरू होईल, उद्या होईल, कोरोनाची आकडेवारी पाहून निर्णय घेतला जाईल, अशाप्रकारची उत्तरे देऊन स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

लोकलबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे, त्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. चर्चेनंतर जो काही निर्णय घेण्यात येईल त्याची अंबळबजावनी केली जाईल आणि त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः नागरिकांना देतील. तसेच दर शुक्रवारी टास्क फोर्सद्वारे राज्यातील करोनास्थितीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जातो, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी शनिवारी केले आहे.

सध्या राज्यात करोनास्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र या विषाणूचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दररोज नव्याने करोनाबाधित होणाऱ्यांची संख्या अजूनही मोठी आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा धोकाही वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत वस्तुस्थितीचा योग्य आढावा घेतल्यानंतरच निर्बंध हटवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी ठोस माहिती द्यावी’

मंत्र्याच्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एकतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोकल कधी सुरू होणार याविषयी ठामपणे सांगायला हवे. आणखी सहा महिने लोकलसेवा सुरू होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितल्यास त्याला कोणाची हरकत नसावी. त्यामुळे प्रवासाच्या इतर साधनांविषयी योग्य नियोजन करता येईल. मात्र ठाकरे यांच्याऐवजी काही मंत्री माहिती नसताना विनाकारण उलटसुलट माहिती देऊन सर्वसामान्य प्रवाशांना झुलवण्याचे काम करत आहेत, अशी नाराजी सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments