आपलं शहर

Mumbai Local Update :लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार ; कळीचा प्रश्न .

दुसरी लाट ही पूर्णपणे ओसरलेली असून तीसरी लाट येण्याची शक्यता दिसत आहे

Mumbai Local Update :  मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढू लागला आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC )आवश्यक ती पावले उचलली आहेत. मुंबईत लोकल(Mumbai local ) सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे परंतु कोरोनाची स्थिती पाहता अद्याप सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरू केली नाही आता लोकल प्रवासाबाबत पालिकेने महत्वाची माहिती दिली आहे.

याबाबत चर्चा करताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar )  यांना विचारले असता सरकारची भूमिका स्पष्ट करत काही महत्त्वाची विधाने केली आहेत.

सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरीही कोरोनामुक्त झालेली नाही असा धोका अजूनही कायम आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आजही ही मोठीच आहे. पहिल्या लाटेत रुग्णसंख्येचा उच्चांक होता .दहा हजाराच्या आसपास रोज नवे रुग्ण आढळून येतात तर आता दुसरी लाट ही पूर्णपणे ओसरलेली असून तीसरी लाट येण्याची शक्यता दिसत आहे. ह्या सगळ्याचा विचारकरता पुन्हा निर्बंधचा निर्णय घ्यावा लागणार असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाची स्थिती पाहता लोकल बद्दल महत्त्वाचे माहिती सांगितली. लोकलच्या सवलती नेमक्या कोणत्या असतील याचा अंतिम विचार आणि निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तज्ञांशी व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतील. दर शुक्रवारी राज्यात ते कोरोना स्थितीचा टास्क फोर्स मार्फत आढावा घेतला जातो व त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाते.लोकलवर निर्बंध लावताना किंवा शिथिल करताना मुंबईसोबतच इतर मुंबई महानगर प्रवाशांचाही विचार करावा लागतो या संपूर्ण भागात कोरोना स्थिती काय आहे ते पाहून निर्णय घेतला जाईल हा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारच्या स्तरावर असेल.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments