खूप काही

Mumbai monsoon update:शेवटी मुंबईमध्ये पावसाला ब्रेक,काय आहे हवामानाचा अंदाज…

मुंबईमध्ये जुलै महिना आला तरी देखील पाऊसाने ब्रेक घेतला आहे.

 

Mumbai monsoon update : गेल्या काही दिवसांत मुंबईसह (mumbai) आसपासच्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी दिल्याने, मुंबईकर हैरान झाले आहेत. यामुळे मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात गरमीशी सामना करावा लागत आहे.(Mumbai rain alert)गेल्या 24 तासांत कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही वेधशाळांच्या मते 0.0 मिमी पावसाची नोंद झाली आहे, दरम्यान, येत्या चोवीस तासांत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम प्रमाणत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईत पाऊस थांबला असेल, तरीदेखील आजुन पावसाळा गेला नसल्याने यापुडे लवकरच मुंबईमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Mumbai weather forecast)28 जुलै रोजी दुपारी 1.45 च्या सुमारास सांताक्रूझमधील शेलार चाळीतील काही घराच्या भिंत कोसळून तीन जण जखमी झाले होते. या नागरिकांना देसाई रुग्णालयात (Desai hospital) नेण्यात आले होते. त्याच बरोबर ठीकठिकाणी झाडे देखील पडली आहेत मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यामुळे भर पावसाळ्यामध्ये अशा घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे,काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पाऊसमुळे (mumbai monsoon) अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते. या पाण्यामुळे रस्ता आणि रेल्वे वाहतूकदेखील विस्कळीत झाली होती. यामुळे अनेकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु आता मात्र मुंबईमध्ये पावसाने चांगलाच ब्रेक घेतला असल्याने काहीजण चिंता व्यक्त करत आहेत, तर काहीजणांना गरमीचा त्रास सहन करावा लागत आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments